Showing posts with label कविता (काहीच्या काही). Show all posts
Showing posts with label कविता (काहीच्या काही). Show all posts

Wednesday, November 11, 2015

वागळेची दिवाळी

रोज खाई थोतरीत
नाम त्याचे वागळे
मारणारा एक जोशी
काम मोठे आगळे

दिवाळीतले फटाके
दे दणादण वाजती
घालुनी कानात बोटे
वागळेद्वय बैसती

वसुबारस पुजतो
गाय माता आमची
बीफ मी खातो चवीने
बरळला तो वागळे

वध नरकासुराचा
कृष्णहस्ते जाहला
आजही नथ्थुरामात
वागळे तो अडकला

लक्ष्मी पुजून मात्र आज
पैसा त्याने मोजला
 नवा काढलेला
चालवावया बैसला

ओवाळती भाऊराया
भगिनी प्रेमळ आमच्या
ठेऊन सणवारा नावे
एकटा तो बैसला

नोकरी तयाला पण
तरीही आज मिळेना
ओकायला गरळ रोज
माईक काही फळेना

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक शुक्ल १, शके १९३७

Wednesday, October 7, 2015

एका सूनबाईंच्या ओव्या

बाप तो फॅसिस्ट, मुसोलीनी मित्र
डोक्यात विखार, भरलासे

सापडे सावज,  खानदानी खास
लग्न ती सत्वर, करतसे

आल्या आल्या तिने, दीराला गिळले
सासू व नवरा, सावकाश

देश खाऊनिया, पोट न भरे
ढेकरही तिजला, येत नसे

मूल मतिमंद, कन्या गतिमंद
जावई मवाली, निपजले

चिरंजीव झेप, गुरूग्रहापुढे
तर्क त्याचा भारी, एस्केपतो

गरीबी ती एक, असे मनोवस्था
भर सभेत तो, बरळला

कन्या रोज घाली, जीन्स ती टाईट
निवडणूक येता, साडी नेसे

बंगला ती बांधी, बंगला ती पाडी
देश तिच्या 'बा'ची, मालमत्ता

जावई छपरी, केला तो केला
वर डोक्यावरी, बसविला

मग जाई सत्ता, साफ होई पत्ता
चोर चव्वेचाळ, उरलेले

पंतप्रधान ते, एक ब्रह्मचारी
देशसेवा व्यसन, जडलेले

लागले धडक, कामाला जोरात
जोर त्यांचा हिला, भिववतो

काळा पैसा आता, कैसा कमवावा
मानवावे कैसे, ऐदीपण

सुचे एक युक्ती, मिळे पक्षा मुक्ती
बंद पाडूनिया, संसदेला

होऊच न द्यावे, काम काही तिथे
लोकां भडकावी, बाहेर ती

आज आंदोलने, उद्या धोंडाफेक
परवा कुणास, पेटवावे

भाऊ भाऊ तिने, भिडविले सारे
फोडाफोडी केली, घरातच

व्हॅटिकन देई, शाब्बाशी तिजला
क्रूस आणि चाँद, आनंदित......

येडी घालोनिया, सदासर्वकाळ
जनता ती फसे, किती दिन

फेसबुक देखे, देखे ती ट्विटर
जनता अडाणी, भासे हिला

जन होती सूज्ञ, देशसेवा यज्ञ
अज्ञतेचा ज्वर, त्यागोनिया

पापांचा तो घडा, भरलासे आता
जनता ती मजा, बघतसे

पुन्हा निवडावे, मग कमळास
रक्तपाती हात, नाकारुन

पाच वर्ष पुन्हा, प्रधानसेवक
आणावे ते मग, निवडून

हातामध्ये हात, त्याची वाताहात ।
होई भविष्यात, मंद्या म्हणे ।। 

-----------------------------------------------------------------
या ओव्यांचा कुठल्याही शहाण्या, अर्धवट, किंवा ठार वेड्या अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींशी; जिवंत, अर्धमेल्या, किंवा मृत व्यक्तींशी; आणि त्यांच्या स्थान, भाषा आणि व्यवसाय वगैरेंशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----------------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ. १०, शालीवाहन शके १९३७

Tuesday, July 28, 2015

भेट




कॉफी पीत पीत
बटांशी हळुवार खेळत
विचार करत असताना तू आलास.....
...संथपणे
हळू हळू पावले टाकत
माझ्या दिशेने,
ठाम निश्चयी पावले तुझी.....
चपला मात्र जराशा लांबच काढून ठेवल्यास
संवेदनशील पर्यावरणवादी तू
किती सुंदर मनाचा आहेस रे.....
की
....गवतावर पादत्राणे घालून चालू नका अशी पाटी वाचली होतीस?

Thursday, April 24, 2014

टग्यामहाराज बारामतीकर

धरणात पाण्याचे
अंमळ दुर्भिक्ष्य
अंत करु पाही
मुतोनिया ||

भगिनीस याच्या
मतदान करा
अन्यथा पाण्याला
बूच मारी ||

विरोध करती
नतद्रष्ट काही
टग्या महाराजां
दृष्ट लागे ||

पिऊन 'सोडला'
अवघा समुद्र
ठेविली का नावे
अगस्त्याला? ||

अगस्त्य अवतार
बारामतीचा टग्या
वंदावेच त्याला
पुन्हा पुन्हा ||

टग्यामागे उभा
तो जाणता राजा
आणि त्याची प्रजा
"शुभेच्छुक" ||

शाई पुसोनिया
मतदान करा
द्विगुणित करा
आनंदही ||

रामराया पुढे
हनुमान उभा
तैसेच ठाकले
हे ते दोघे ||

बोले तैसा चाले
जयांची ही कीर्ती
तयांना वंदावे
पुन्हा पुन्हा ||

Monday, June 25, 2012

प्रोजेक्ट

प्रोजेक्टचे काम
आनंद निधान
त्यावीण का दाम?
विचारो नये || २ ||

रोज येथे यावे
कष्ट ते करावे
सेकंदे का मरावे?
विचारो नये || ३ ||

पिता पिता चहा
मॉनिटरकडे पहा
होऊ का रिलॅक्स?
विचारो नये || ४ ||

परवाचे उद्या अन्
उद्याचे आजच करा
आजचे काल करू का?
(कर की मेल्या...)
विचारो नये || ५ ||

सरदार गोमटा
उगारी डेडलाईनचा सोटा
आव का तो मोठा?
विचारो नये || ६ ||

क्लायंट तो पेटे
व्हेंडर केकाटे
मरतो इथे कोण?
विचारो नये || ७ ||

साम दाम दंड
आली फीडबॅकची झुंड
कामात कधी खंड?
विचारो नये || ८ ||

आज यांचे काम
उद्या यांचे काम
पण आमुचे 'काम'?
विचारो नये || ९ ||

मोडली आमुची मान
उरले नाही त्राण
हरपले का भान?
विचारो नये || १० ||

आठवडा खपला
विकेंडही मेला
आराम कसला?
विचारो नये || ११ ||

असे आमुचे प्रोजेक्ट
सांगितले तुम्हांस फॅक्ट
काय करावे एग्झॅक्ट?
विचारो नये || समाप्त ||

Wednesday, March 16, 2011

आयचाघोरसचा सिद्धांत

तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं

चौकोनात फिरणार्‍या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ

शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
शेवटी कितीही वेगात फिरली
तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो (हे एको होतंय असं समजावं)

Tuesday, September 21, 2010

मी तुझा चंद्र झालो

टीपः ही कविता अक्षरशः अगदी 'ही' आहे.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

मी तुझा चंद्र झालो....
केव्हा काय विचारतेस?
तोंड धुता धुता
हळू हळू वर मागे सरकणार्‍या कपाळरूपी किनारपट्टीकडे पाहून
कुठपर्यंत पाणी मारावं समजलं नाही
तेव्हाच....

Saturday, May 22, 2010

झुरळ, गणित आणि तर्कशास्त्र

अ = ब,
ब = क,
म्हणून अ = क? नाही!!

कारण...
बायको झुरळाला घाबरते,
झुरळ आपल्याला घाबरते,
म्हणून बायको आपल्याला घाबरते का? नाही!!
ती घाबरते, झुरळालाच!