Wednesday, August 12, 2015

अस्तनीतले पत्रनिखारे

याकुबने माझे पेपर चोरले त्याच वेळी
कलामांना गाडले जात होते
बातम्यांच्या ढिगात
पुस्तकातल्या जॉर्ज बर्नार्ड शॉला मी विचारलं
यांच्या लेखी कोण मोठा
म्हणालाआमच्यावेळी पत्रकर्त्यांना 
सायकल अपघात आणि संस्कृतीचा र्‍हास
यात फरक करता येत नसे
आता तर सगळंच बिघडलंय 
अगदी तुमच्या दत्ताचीही बरखा झाली 
आता बातम्याच्या महापुरातून 
कलामांचं कलेवर शोधून त्याला
पहिल्या पानावर मोठ्या टाईपात बसवणार तरी कोण?
मधेच टायगर गुरगुरला 
बदला घेईन याचा
आणि अंत्यदर्शनाला जमलेल्या पंधरा हजार 
हिरव्यागोल टोप्या म्हणाल्या
भगवीच्यांनो आता बघाच 
बड्या कबरीस्तानात 
किती मोठं स्मारक होतं तेअफझुल्ल्यापेक्षा मोठ्ठं 
अन् होतं की नाही पहा
त्याचं तीर्थस्थान
तेवढ्यात मेमनमाता कळवळली 
कितीही मोठ्या आगी लावा
पण त्या वन्हीत माझ्या छकुल्याचं सी..चं सर्टिफिकेट घालू नका रे
......आणि पुन्हा वर्तमानपत्रांना पान्हा फुटला
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय विचारणार्‍यांपासून
डोके फिरूनच छापणार्‍यांपर्यंतचा प्रवास
सुफळ संपूर्ण झाला